chandrapur I सिंदेवाही पोलिसांचा अभिनव उपक्रम. रस्त्यावर विनाकारण तसेच बिना मास फिरणारं ची केली रॅपिड अँटी जेन टेस्ट

सिंदेवाही पोलिसांचा अभिनव उपक्रम. रस्त्यावर विनाकारण तसेच बिना मास फिरणारं ची केली रॅपिड अँटी जेन टेस्ट

सिंदेवाही पोलीस स्टेशन तसेच ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही यांच्या सौजन्याने आज दिनांक 10/05/21 रोजी सिंदेवाही बस स्टॅन्ड येथील प्रवासी तसेच रस्त्यावर विनाकारण व बिना मास्क भटकणार यांची थेट रॅपिड अंटिजेन टेस्ट करून घेण्यात आली. यामध्ये एकूण 50 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.
सिंदेवाही शहरांमध्ये सिंदेवाही पोलिसांच्या अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे विनाकारण रस्त्यावर भटकणार यांची चांगलीच धावपळ झाली. प्रशासनातर्फे सतत आवाहन करण्यात येऊन सुद्धा काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यामुळे अशा प्रकारच्या चाचण्या करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
सदरची कार्यवाही माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर व पोलीस पथक तसेच ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथील वैद्यकीय अधिकारी श्री झाडे , श्री मानकर, सौ चैताली कावळे तसेच वैद्यकीय पथक यांनी केलेली आहे.
सदर कार्यवाही चे समस्त नागरिकांनी स्वागत केले आहे.