1 डिसेंबर पासून प्रति लिटर 39 तर अर्धा लिटर दुधाची 20 रुपये यादराप्रमाणे होणार विक्री

1 डिसेंबर पासून प्रति लिटर 39 तर अर्धा लिटर दुधाची 20 रुपये

यादराप्रमाणे होणार विक्री

चंद्रपूर दि. 30 नोव्हेंबर : शासकीय दूध योजना,चंद्रपूर अंतर्गत विक्री करण्यात येणाऱ्या पाश्‍चराईज्ड व होमोनाईज्ड गाय दूध, टोन्ड (आरे) दुधाच्या विक्री दरात दि. 1 डिसेंबर 2021 पासून प्रति लिटर (1000 मि.ली) 39 रुपये व अर्धा लिटर ( 500 मि.ली) 20 रुपये दर सर्व करासह आकारण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे दुग्धशाळेतील उपलब्ध असलेल्या जुन्या दराचा पॉलीथिन फिल्मचा साठा संपुष्टात येईपर्यंत व वाढीव दराची पॉलीथिन फिल्म उपलब्ध होईपर्यंत जुन्या दराच्या पॉलीथिन फिल्म मधूनच दुधाची विक्री करण्यात येईल. तरी, यासंदर्भात सर्व ग्राहक व वितरकांनी नोंद घ्यावी. असे शासकीय दूध योजनेचे दुग्धशाळा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.