मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे बल्लारपूर येथील किल्ले व परिसराची स्वच्छता

मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे

बल्लारपूर येथील किल्ले व परिसराची स्वच्छता

            चंद्रपूर,दि. 04 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची),चंद्रपूरद्वारे बल्लारपूर येथील किल्ला व परिसराची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंत खेडकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची),चंद्रपूर येथील गटनिदेशक सुनिल मेश्राम, प्रभात होकम आदींची उपस्थिती होती.

कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. 

कार्यक्रमाचे संचालन प्रमोद भेंडे तर आभार प्रभात होकम यांनी मानले. यावेळी प्रमोद भेंडे, रवीकिरण सोरते, सुशील महाजन, मोनाली मून, सुनीता डोंगरे, कांचन कुंटेवार, सुषमा मस्की, सुनील समर्थ, सुरेश लोणारे, आदी उपस्थित होते.