परमात्मा एक यात्रेसाठी जादा बसेसची व्यवस्था

परमात्मा एक यात्रेसाठी जादा बसेसची व्यवस्था

 

भंडारा दि. 25: परमात्मा एक आश्रम, मौदा येथे दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी रोजी भाविकांची यात्रा भरत असते. या यात्रेकरिता जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले आहे .भंडारा, गोंदिया साकोली, तुमसर, तिरोडा व पवनी आगारा मार्फत या जादा बसेस यात्रे करता सोडण्यात येणार आहे,त तरी भाविकांनी यात्रेकरीता बसेसचा वापर करावा

असे आवाहन राज्य परिवहन महामंडळ भंडारा तर्फे करण्यात येत आहे .बस स्थानकावर तीस पेक्षा जास्त भाविक यात्रेकरीता राहिल्यास ग्रुप बुकिंगची सुद्धा सुविधा देण्यात येईल. तरी याबाबतीत सर्व फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, भंडारा यांनी केले आहे.