Home Breaking News मंत्रिमंडळ निर्णय: इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीने वाढ

मंत्रिमंडळ निर्णय: इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीने वाढ

मंत्रिमंडळ निर्णय: इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीने वाढ

राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोय व्हावी यासाठी ३६ जिल्ह्याच्या ठिकाणी मुला आणि मुलीसाठी ७२ वसतिगृहे आहेत. सध्या विभागीय स्तरावरील आणि जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६०० रुपये देण्यात येतात. मंत्रिमंडळ बैठकीत आता विभागीय स्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा १५०० रुपये तर जिल्हा स्तरावर १३०० रुपये निर्वाह भत्ता देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे वसतिगृहात राहणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातीं व विशेष मागास प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.