बॅंक ऑफ इंडिया मध्ये चोरटय़ांनी उडवले पैसे…

बॅंक ऑफ इंडिया मध्ये चोरटय़ांनी उडवले पैसे…

सिंदेवाही :- बॅंक ऑफ इंडिया शाखा गुंजेवाही येथे तुमचे नोट खराब असुन पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने चोरटय़ांनी पैसे उडवल्याची घटना नुकतीच बॅंकेत घडली.
सविस्तर वृत्त असे की बॅक ऑफ इंडिया शाखा गुंजेवाही लोनवाही येथे लाडबोरी येथिल जोगेश्वर धोंगडे हे मुलगा व पत्नी सोबत पैसे काढण्यासाठी बॅकेत आले. त्यांनी बॅंकेतून पत्नीच्या खात्यातील 47600 काढले व खुर्चीवर बसून पैसे मोजत असताना अनोळखी इसम येऊन तुमचे नोट खराब असुन मोजुन देण्याच्या बहाण्याने पैसे घेतले परंतु पैसे मोजून दहा हजार रुपये कमी देऊन तिथून पोबारा केला. सदर इसमाने आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच त्या इसमाचा शोधाशोध केली,परंतु सदर इसमाने बॅंकेत तोपर्यंत पळ काढला.
सदर घटनेची तक्रार पोलिसांकडे दाखल केली त्यानंतर पोलिसांनी सिसिटीव्ही कॅमेर्‍यात बघितले असता सदर इसम इतर एका व्यक्तीसोबत गाडीने पळत असल्याचे दिसून आले.
या अगोदर सुद्धा सिन्देवाही येथील दयाबाई रामटेके या वृध्द महिलेचे पैसे चिल्लर करण्याच्या बहाण्याने पैसे चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर बँकेत अशिक्षित व वृद्ध महिला पुरूषाना लुबाडणूक करून पैसे हडप करण्याच्या घटना बँकेत घडत असल्याने बॅक परिसरात पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.