मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन

गडचिरोली,दि.27: जिल्हाधिकारी गडचिरोली, संजय मिणा यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 24 नोव्हेंबर, 2023 रोजी भामरागड तालुक्यातील मौजा मन्नेराजाराम येथे तहसिलदार प्रकाश पुप्पालवार भामरागड यांचे अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरामध्ये जवळपास 700 महिलांनी भाग घेतले व 18 गावातील मोठया संख्येनी नागरिकांची सुध्दा उपस्थिती होती. या शिबीरात 18 गावातील महिला व पुरुष यांची उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत तालुक्यातील विविध कार्यालय व बँक मार्फत 3129 लाभ महिला व नागरीकांना वितरीत करण्यात आले. सदर शिबीर करिता उपस्थित सर्व महिला व नागरिक यांची शिबीराचे ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सर्व कार्यालयाचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले. उपस्थित महिला यांनी प्रत्येक स्टॉलवर जावुन शासनाचे विविध योजनांचे माहिती घेतले. तालुका आरोग्य अधिकारी मार्फत लावण्यात आलेले आरोग्य तपासणी स्टॉल मध्ये माहिलांचे आरोग्य तपासणी मोहिम सुध्दा राबविण्यांत येवुन आरोग्य बाबत व इतर सर्व कार्यालयाचे विविध शासन योजनांची माहिती प्रदर्शित करण्यांत आली. सदर अभियान कार्यक्रम यशस्वी करणेकरिता तहसिल कार्यालयीन कर्मचारी, कोतवाल व तलाठी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी स्वपनील मगदुम संवर्ग विकास अधिकारी , भुषण चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, जनार्धन वडलाकोंडा गट शिक्षण अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बाल विकास अधिकारी, भामरागड कुमारी शारदा कोरेत सरपंच मन्नेराजाराम, श्रीमती कमला कुसराम सरपंच येचली आणि सामाजिक कार्यकर्ते सिताराम मडावी जिजगांव हे उपस्थित होते.