कोंडी येथे मतदार जागृती कार्यक्रम…

कोंडी येथे मतदार जागृती कार्यक्रम

भंडारा दि. 15 : लोकसभा मतदाना जवळ येत असून  19 एप्रिल रोजी भंडारा गोंदिया मतदारसंघात लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे व मतदानाची टक्केवारी टक्केवारी वाढवावी यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय  स्वीप कमिटी जिल्हा भरात विविध उपक्रम राबवून मतदार जनजागृती करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती चा कार्यक्रम कोंडी येथे घेण्यात आला.

मतदार जनजागृतीसाठी गावातील नागरिकाची घरोघरी जाऊन भेट घेऊन 100 टक्के मतदान  उद्दिष्ट कसे साध्य करता येईल याबद्दल माहिती दिली. प्रत्येक चौकात मतदार बंधू जागा हो, लोकशाही चा धागा हो, अश्या घोष वाक्य  दुमदुमले. यामतदार जनजागृती कार्यक्रमसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षिका यांनी तसेच सर्व विदयार्थ्यांनी सहकार्य केले.