टाकळी येथील खुनातील आरोपीतांना पोलीसांचे पथकाने अवघ्या 3 तासाचे आत घेतले ताब्यात.


टाकळी येथील खुनातील आरोपीतांना पोलीसांचे पथकाने अवघ्या 3 तासाचे आत घेतले ताब्यात.

भंडारा शहरातील टाकळी (भगतसिंग वार्ड) हा परीसर मजुरदार वर्गीयांचा परीसर असून आज दिनांक 12/03/2024 चे सकाळी 9.00 वा दरम्यान पोलीसांना माहीती प्राप्त झाली की, टाकळी येथील निर्वान मेंटलचे भिंतीलगत असलेल्या सिमेंन्ट नाली मध्ये एक प्रेत पडलेले आहे. व प्रेताचे वर एक मोपेड ठेवलेली आहे. अशा प्राप्त बातमीचे अनुषंगाने पोनि, सुर्यवंशी हे त्यांचे स्टॉफसह घटनास्थळी पोहचले पोनि. सुर्यवंशी सा. यानी सदरची बातमी मा. वरीष्ठांना दिली असता डॉ. श्री. अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी हे पोहवा. टेभुर्णे व पोहवा डायले यांचेसह पोहचले. मा. श्री. लोहीत मतानी पोलीस अधिक्षक भंडारा हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहचले सदर घटनेची सहानीशा केली असता. सदरचे प्रेत हे टाकळी (भगतसिंग वार्ड) येथे राहनारा कपील अशोक उजवने यांचे असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. श्री.अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी व भंडारा पोलीसानी तपासाचे चके फिरवून अधिक माहिती घेतली असता, मृतक कपील अशोक उजवने हा दिनांक 11/03/2024 चे 22.00 वा. दरम्यान नामे 1) करण दिलीप भेंदे वय अंदाजे 20 वर्षे 2) ऋषभ संजय दोनोडे वय अंदाजे 20 वर्षे दोन्ही राहनार भगतसिंग वार्ड टाकळी यांचे सोबत टाकळी परीसरात फिरत होते अशी माहीती प्राप्त झाली.

पोलीसांनी प्राप्त माहीतीच्या अनुषंगाने आरोपी शोधकामी पथक तयार करून आरोपीचे शोधकामी रवाना केले असता. यातील नमुद दोन्ही आरोपी हे टाकळी परीसरात एका पडीत घरामध्ये लपुन बसले असल्याची गोपनीय माहीती पो.हवा. प्रशांत भोंगाडे यांना प्राप्त झाल्याने डॉ श्री. अशोक बागुल यांनी स्वतः व त्यांचे कार्यालयातील पो.हवा. विजय डोयले ब.न. 858 पोहवा. टेभुर्णे ब.न. 606 पो.शि. उमेश मेश्राम ब. न. 600 पोशि गोडसेलवार ब.न. 128 यांनी नमुद दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेतले. नमुद दोन्ही आरोपीतांना कपील उजवने यांचे खुनाच्या संबंधाने विचारना केली असता दिनांक 11/03/24 चे23.00 वा. दरम्यान मृतक कपील अशोक उजवने व दोन्ही आरोपी हे निर्वान मेटलचे मागील खुल्या जागेत हजर असताना, त्याचे दरम्यान भांडन होवून आरोपीतां जवळ असलेल्या चाकुने मृतकाचे शरीरावर वार करून मृतकास जागीच ठार केले व मृतकाचे प्रेत बाजुला असलेल्या सिमेंन्ट नालीमध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबूल केले आहे. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा अंर्तगत अप. क.231/24 कलम 302,201,34 भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हाचे गांर्भिर्य लक्षात घेता. मा.श्री. लोहीत मतानी पोलीस अधिक्षक भंडारा यांनी घटनास्थळी स्वतः मार्गदर्शन केल्याने तसेच मा.श्री. ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधिक्षक भंडारा मार्गदर्शनात देखील मा.श्री.डॉ अशोक बागुल यांनी व पो.नी. सुर्यवंशी यांनी अथक परीश्रम घेवून मा.श्री डॉ अशोक बागुल यांनी आरोपीताना स्वतः ताब्यात घेवून कायदेशिर कार्यवाही केली आहे. सदरचा गुन्हा प्राथमिक स्वरूपाचा असून गुन्हाचा पुढील तपास पो.नी. गोकुळ सुर्यवंशी पोस्टे भंडारा हे करीत आहेत.