देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

भंडारा दि. 1 : शेतीविषयक नवनवे कृषि तंत्रज्ञानातून उत्पन्नवाढ होण्यासाठी कृषि विभागामार्फत राज्यातील शेतकन्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी 3 फेब्रुवारीपर्यत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती संगिता माने यांनी केले आहे.

शासनाकडून अभ्यास दौ-यातील शेतक-यांना एकुण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रूपये प्रति लाभार्थी यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान देण्यात येईल, कृषि विस्तार कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सन २०२३-२४ मध्ये जिल्हयातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौ-यांचे आयोजन करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, न्युझीलँड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्टेलिया, सिंगापूर आदी सभांव्य देशांची निवड केली आहे.

अभ्यास दौ-याकरीता लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा, त्यांच्या नावे चालु कालावधीचा सातबारा व आठ-अ उतारा असावा. शेतक-यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र (प्रपत्र १) अर्जासोबत सादर करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जासोबत आधार पत्रिकेची प्रत द्यावी. शेतकरी किमान बारावी उत्तीर्ण असावा. शेतकऱ्यांचे वय २५ ते ६० वर्षे असावे. शेतकरी वैद्य पारपत्रधारक असावा, शेतकरी शासकीय, निम शासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीत नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार नसावा. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. दौ-यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाल्यानंतर शेतक-याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदरूस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.

शेतकऱ्यांचे त्यांचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर दौऱ्याचा शंभर टक्के खर्च प्रवासी कंपनीकडे आगाऊ स्वतः भरावा लागेल व दौरा पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम खात्यावर जमा करण्यात येईल. इच्छुक शेतकन्यांना दि. ०३/०२/२०२४ पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क करून अर्ज जमा करावेत. प्रत्येक जिल्हयातून तीन शेतक-यांची निवड होणार असून अधिक अर्ज आल्यास सोडतीव्दारे निवड निश्चित केली जाणार असल्याचेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी माने मॅडम यांनी सांगीतले.