स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्काराकरीता प्रवेशिका आमंत्रित

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्काराकरीता प्रवेशिका आमंत्रित

 

भंडारा, दि. 6 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार योजनेअंतर्गत निवडीअंती सन 2022 चे राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशीत झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकासाठी 9 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 या विहित कालावधीत प्रवेशिका मागविण्यात आलेल्या आहेत.

 

जिल्ह्यातील लेखकांनी व प्रकाशकांनी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारा करिता प्रवेशिका सादर करावी. या योजनेअंतर्गत प्रवेशिका सादर करणे सुलभ व्हावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात करमणूक कर शाखेत या स्पर्धेसाठी माहिती पुस्तिका व प्रवेशिकेची प्रत उपलब्ध आहे.