उद्योजकता विकासाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी महा-60 कार्यक्रमाचे आयोजन Ø जिल्ह्यातील युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

उद्योजकता विकासाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी महा-60 कार्यक्रमाचे आयोजन

Ø जिल्ह्यातील युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.12 : उद्योग संचालनालयाकडून उद्योजकता विकासाबाबत जागरुकता वाढवण्यासाठी आणि जिल्ह्यात उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करण्यासाठी डिस्ट्रीक्ट आऊटरिच प्रोग्राम महा-60 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 17 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय, बायपास रोड, चंद्रपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

स्टार्टअप सुरू करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींना न्यूयॉर्कमधील नामांकित कोनेल विद्यापिठामध्ये शासनाच्या माध्यमातून जाण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. यावेळी नवउद्योजकांना मार्गदर्शन करणेसाठी विविध नामांकित तज्ञ, एक्सईडी डेव्हलपमेंट लिमीटेडचे कार्यकारी संचालक, आयडीबीआय बँकेचे उपाध्यक्ष, कॉलेजचे प्राचार्य, नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये जिल्हयातील युवक-युवतींनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.