13 नमुना ब वर कोणत्याही आक्षेप किंवा सूचना असल्यास 16 फेब्रुवारी पर्यत तहसिल कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

13 नमुना ब वर कोणत्याही आक्षेप किंवा सूचना असल्यास

16 फेब्रुवारी पर्यत तहसिल कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

             भंडारा,दि.14 : ग्रामपंचायत जामगाव-वळद पु.व मौदी पु.येथील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की,भंडारा तालुक्यातील माहे जानेवारी,2024 ते डिसेबर,2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जामगाव-वळद पु.व मौदी या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 फेब्रुवारी,2024 पर्यत प्रारुप आरक्षणावर कार्यवाही करुन 13 फेब्रुवारी,2024  रोजी  प्रारुप प्रभाग रचनेचा मसुदा परिशिष्ट 13,नमुना-ब संबंधित ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय,मंडळ अधिकारी कार्यालय,तहसिल व पंचायत समिती कार्यालय भंडारा येथील सूचना फलकावर सर्व नागरीकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्दी करण्यात आली आहे.

          त्याकरिता प्रसिध्द करण्यात आलेल्या परिशिष्ट 13,नमुना व वर कोणत्याही नागरीकांच्या आक्षेप किंवा सूचना असल्यास ते आक्षेप किंवा सूचना 16 फेब्रुवारी,2024 नंतर सादर केलेल्या आक्षेप व सूचनांचा विचार केला जाणार नाही.यांची संबंधिताना नोंद घ्यावी,असे आवाहन तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी ग्रापनि,विनीता लांजेवार यांनी कळविले आहे.