ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचा भंडारा जिल्हा दौरा

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचा भंडारा जिल्हा दौरा

भंडारा, दि.27: महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे 28 ऑगस्ट 2021 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.

सकाळी 9.00 वाजता बेझनबाग निवासस्थान नागपूर येथून मोटारीने रामटेक- तुमसर मार्गे माडगीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता 33 के.व्ही. उपकेंद्र माडगी येथे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता 33 के.व्ही. उपकेंद्र माडगी येथून गोंदियाकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता भंडारा येथे आगमन व विश्रामगृह भंडारा येथे भेटीगाठी. सायंकाळी 6.00 वाजता प्रशिक्षण केंद्र महावितरण मंडळ कार्यालय भंडारा येथे महावितरण, महापारेषण, महाऊर्जा अधिकारी तसेच विद्युत निरीक्षक यांच्या समवेत बैठक. रात्री 7.30 वाजता नागपूरकडे प्रयाण करतील.