२१ वी शास्त्रीय सल्लागार सभा कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे संपन्न

२१ वी शास्त्रीय सल्लागार सभा कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे संपन्न

कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे २१ वी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा दि.०४ फेब्रुवारी २०२४ ला पार पडली. यावेळी मा.डॉ.एस. आर. गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला, यांच्या अध्यक्षेखाली दिप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली. मा. डॉ. डि.बी. उंदिरवाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ.ए.व्ही. कोल्हे, सहयोगी संशोधन संचालक, धान संशोधन केंद्र, सिंदेवाही, मा. शंकर तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपुर, डॉ. व्हि.जी नागदेवते, वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, डॉ.जी.आर. शामकुवर, सहायोगी प्राध्यापक, कृ.सं.के, सिंदेवाही, ए. आर. महल्ले, ता.कृ.अ. सिंदेवाही.हे कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

डॉ. व्हि. जी नागदेवते, वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, के.व्ही. के., सिंदेवाही, यांनी सभेचे प्रास्ताविक करून कार्यालयाचा रब्बी २०२३-२४ चा प्रगती अहवाल सादर केला. अध्यक्षीय मागदर्शनामध्ये मा. डॉ. एस. आर. गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला यांनी “एक गांव एक तंत्रज्ञान” या सुत्राचा वापर करून जास्तीत जास्त शेतक-यापर्यंत विद्यापिठाच्या तंत्रज्ञानाचा तसेच शेतकरी बांधवांचे लागत उत्पादन खर्च ३३ टक्के कमी, उत्पादनात वाढ व मुल्यवर्धन प्रक्रिया करून शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले. सुशांत डंबोळे ,निलकमल बारसागडे, संतोष पवार, संदीप तायडे, पराग सहारे, कैलास कामडी या सभेच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य दिले.