डाकघरासाठी ज्येष्ठांना चढाव्या लागतात २० पायऱ्या

डाकघरासाठी ज्येष्ठांना चढाव्या लागतात २० पायऱ्या

शहरातील राष्ट्रीय
महामार्गावर असलेल्या तीन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोस्ट ऑफिस असल्याने ज्येष्ठ नागरिकांना पोस्ट ऑफिसचा व्यवहार करण्यासाठी जवळपास २० पायऱ्या चढून जावे लागते. ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात एवढ्या पायऱ्या चढताना उतरताना त्यांना त्रासदायक अडचण जात आहे.

सिंदेवाही तालुक्यातील भारतीय डाक विभागाचे उपडाक घर सिंदेवाही येथील मुख्य बाजारपेठेच्या राष्ट्रीय महामार्गावर आहे. पोस्ट ऑफिसमध्ये टपाल विभाग, फिक्स रक्कम, दामदुप्पट, बचत खाते, रेवणी तिकीट, पोस्टकार्ड व आरडी , तसेच आधार अपडेट यासह, पोस्टातील विमा सुविधा, तसेच विविध सेवा उपलब्ध असल्याने अनेकजण पोस्ट कार्यालयात आवश्यक कामे करण्याकरिता जात असतात. मात्र भारतीय डाक विभागाचे उपडाग घर हे तीन मजली इमारतीतील वरच्या मजल्यावर आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास 20 पायऱ्या चढाव्या व उतराव्या लागतात. नेटवर्क सुविधा कधी कधी बंद असल्यामुळे चार वेळा चकरा मारावे लागत असतात. महिला , पुरुष ज्येष्ठांना त्रासदायक होतो आहे. त्यामुळे शहरातील डागघर तळमजल्यावर हलवावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे .