परिश्रमाशिवाय यश शक्य नाही – ना. विजयभाऊ वडेट्टीवार

परिश्रमाशिवाय यश शक्य नाही – ना. विजयभाऊ वडेट्टीवार

नवनवीन पद्धती शिक्षण क्षेत्रात येत आहे. दिवसागणिक स्पर्धा वाढत आहे. गरीबी आहे म्हणून रडत बसायचे नाही. अभ्यासासाठी परिश्रम घेतलेच पाहिजे. परिश्रमाशिवाय यश शक्य नाही. परिश्रमाने मिळवलेल्या यशताच खरा आनंद असतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले. ते लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ नवरगाव द्वारा संस्थेचा 65 वा वर्षपूर्ती सोहळा, लोकसेवा प्राथमिक विद्यालयाच्या नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा व स्नेहसंमेलन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
नुकत्याच संपन्न झालेल्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश निनावे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून चिमूर विधानसभा समन्वयक तथा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर, सिंदेवाही तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, माजी जि. प. सभापती अशोक गायकवाड, नवरगाव सरपंच राहुल बोडणे, नवरगाव काँग्रेस अध्यक्ष सुशांत बोडणे, लोकसेवा संस्थेचे पदाधिकारी एकनाथ निनावे, नेताजी कामडी, सुरेश जैस्वाल, कुणाल निनावे, मंगलदास निनावे, रेखा निनावे, सुभाष हेडाऊ, पुंडलिक डोंगरवार, बाबा जैस्वाल यांचे सोबतच मुख्याध्यापक संजय मरस्कोल्हे, मुख्याध्यापक अनिल शेंडे, स्नेहसंमेलन सचिव शिवशंकर काऊलकर, क्रीडा प्रमुख नरेंद्र निखारे आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका क्रिष्णा वडथे, यांनी तर आभार पर्यवेक्षक नरेंद्र लोधे यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक, पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सफलतार्थ शाळेचे शिक्षक, शिक्षिका, स्वयंसेवकांनी सहकार्य केले.