सोयाबीन पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भावावर उपाययोजना करण्याचे आवाहन

सोयाबीन पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भावावर उपाययोजना करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.23 ऑगस्ट : मागील काही दिवसापासून सोयाबीन पिकावर ‘सोयाबीन पिवळा मोझॅक’ या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सुरुवातीच्या अवस्थेत फक्त काही झाडावरच हा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु नंतर मात्र पांढऱ्या माशीमुळे या रोगाचा प्रसार होतो व संपूर्ण पीक “सोयाबीन पिवळा मोझॅकला”बळी पडू शकते. यासाठी “सोयाबीन पिवळा मोझॅक” ने ग्रस्त झाडे तात्काळ उपटून घ्यावी व नष्ट करावी. एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावे. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम 12.60 टक्के + लॅंबडा सायहॅलोथ्रोन 9.50 टक्के, झेडसी 2.5 मिली/10 लिटर पाणी (व्यापारी नाव-अलिका) किंवा बीटासायफ्लुथ्रोन 8.49 टक्के + इमिडाक्लोप्रिड 19.81 टक्के, 7 मिली/10 लिटर पाणी (व्यापारी नाव-सोलोमोन) या कीटकनाशकांची तात्काळ फवारणी करावी, या उपाययोजना शेतकरी बांधवांनी तात्काळ कराव्यात, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ यांनी कळविले आहे.