लाभार्थ्यांनी यंत्रणेला सहकार्य करावे

लाभार्थ्यांनी यंत्रणेला सहकार्य करावे

भंडारा, दि. 18 : मोहाडी तालुक्यातील सर्व जनतेला याद्वारे सुचित करण्यात येत आहे की, मोहाडी तालुक्यात श्रावणबाळ/वृध्दापकाळ योजने अंतर्गत अपात्र लाभार्थी लाभ घेत असून अजूनही अनेक पात्र लाभार्थी लाभापासून वंचित असल्याबाबतच्या अनेक तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुषंगाने श्रावणबाळ/वृध्दापकाळ योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्या 65 पेक्षा कमी वयाचे अपात्र लाथार्थ्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आलेली असून संबंधित गावच्या शाळेतील दाखल खारीज नोंदवहीतील जन्म तारखेची पडताळणी करून लाभार्थ्यांच्या पात्र/अपात्रतेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी सदर तपासणी कामात शासकीय यंत्रणेला मदत मदत करावी, असे मोहाडीचे तहसीलदार दिपक कारडे यांनी कळवले आहे.