26 ते 30 जानेवारी कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन

26 ते 30 जानेवारी कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा

यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन

              भंडारा,दि.27 :कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन दिनांक २६ जानेवारी से ३० जानेवारी २०२४ कालावधीमध्ये रेल्वे मैदान, खात रोड भंडारा येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

         सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा.ना.श्री. विजयकुमार गावित, मंत्री आदिवासी विकास तथा पालकमंत्री भंडारा यांच्या हस्ते पार पडले. उध्दघाटकीय मार्गदर्शनामध्ये आत्मा, कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र यांचे व्दारे राबविण्यात येणारे वातावरणातील बदल लक्षात घेऊन करण्यात आलेल्या पिकांच्या उत्पादन वाढीचे यशस्वी प्रयोग प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना नविन बाट दाखविण्याचे काम करणार असुन भंडारा जिल्हातील शेतकऱ्यांनी धान व्यतिरीक्त नविन पिकाचे उत्पादन घेऊन आर्थिक सक्षम होण्याची गरज आहे.

          मजुरांची वाढती टंचाई व शेतीमध्ये न परवडणाऱ्या समस्यांना तोंड देणाऱ्या कमी जमीन धारना असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शेतीला लागणारे विविध यंत्र व औजारांचे उपयोगाची माहिती प्रात्याक्षिकांच्दारे शेतकऱ्यांना या प्रदर्शनीच्दारे देण्यात येणार असुन यांत्रिकीकरणाब्दारे शेतकऱ्यांचा खर्च कमी करता येऊ शकतो. कृषि महोत्सवातील तंत्रज्ञान शेतकन्यांनी आत्मसात करुन यशस्वी शेती करावी असे आवाहन केले तसेच पिक निहाय क्स्टर विकसीत करणे या करिता जिल्हास्तरावरुन जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे नमुद केले.

          उद्धघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गंगाधरजी जिभकाटे अध्यक्ष जि.प. भंडारा यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेले अवजारे, कृषि निविष्ठा व राबविण्यात येणारे नवनविन तंत्रज्ञान यांची माहिती जाणून देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. सुनिलजी मेंढे खासदार लोकसभा यांनी भात उत्पादक भागातील शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा करुन त्याचे उत्तर कृषि महोत्सवातुन जाणुन घेण्याकरिता शेतकऱ्यांना आवाहन केले.

           उध्दघाटन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मा. जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांनी कृषि महोत्सवाच्या आयोजनाची संकल्पना स्पष्ट करुन जिल्हा प्रशासनाचे, शेतकऱ्यांबद्दल सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली त्याचप्रमाणे जिल्हातील शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत सुरु असलेले प्रसत्न व भविष्यातील त्यांच्या वाटचालीची चर्चा केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. समिर कुर्तकोटी मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी केले.