स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा न्यायालय येथे कलाप्रदर्शनी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा न्यायालय येथे कलाप्रदर्शनी

भंडारा, दि. 15 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार जिल्हा न्यायालय भंडारा येथे 12 नोव्हेंबर 2021 रोजी कलाप्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. महर्षी विद्यामंदिर, नुतन कन्या विद्यालय तसेच लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथील मुलांनी काढलेल्या चित्रांची पाहणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा अंजू शेंडे यांनी केली. या कलाप्रदर्शनीमध्ये न्यायालयीन कामकाजाची माहिती पक्षकारांना व्हावी यासाठी विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली होती.

या कार्यक्रमप्रसंगी अति. सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे, सह दिवाणी न्यायाधीश ए. के. आवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले, सह दिवाणी न्यायाधीश आर. पी. थोरे, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. ए. पटेल, सह दिवाणी न्यायाधीश सी. वाय. नेवारे, अति. दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिंगणघाटे, अति. दिवाणी न्यायाधीश आर. एस. जैन, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते.