महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद

गवळण,भारुड,लावणी चे जल्लोषात सादरीकरण

महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद

            भंडारा, दि.27 :सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन भंडारा यांच्या वतीने आजपासून जिल्ह्यात पाच दिवस (26 ते 30 जानेवारी 2024) साहित्य- संस्कृती- नाट्य- भक्ती- संगीत या सर्वांचा सुंदर समन्वय असलेल्या महासंस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन दि .26 ला पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते झालेले आहे.

महोत्सवाच्यासायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन करण्यात आले.

         महाराष्ट्राची संस्कृती लोप पावू नये त्या संस्कृतीला उजाळा मिळावा म्हणून  महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कलावंतांनी संस्कृतीला उजाळा मिळावा म्हणून गणेश वंदना, गवळण, भूपाळी, ओवी, धनगरी गीत, कोळीगीत, लोकगीत, गोंधळ, भारुड, पोवाडा, मुरळी, वारकरी, मंगळागौर, पोतराज आणि कडकलक्ष्मी, पिंगळा, लावणी, जागर, भैरवी असे लोकसंगीतातील अस्सल सुश्राव्य गीत प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

         सदर कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर, उपजिल्हाधिकारी श्री. श्रीपती मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती लीना फलके तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व जिल्हयातील रसिक श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.