27 ते ३० जानेवारी कृषि महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजन

27 ते ३० जानेवारी कृषि महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजन

             भंडारा,दि.27 : जानेवारी ते ३० जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन रेल्वे मैदान खात रोड भंडास येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनीमध्ये दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधुन पौष्टीक तृणधान्याचे एककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या पाककला स्पर्धेमध्ये सहभाग निशुल्क असुन स्पर्धकांनी पदार्थ हा आपल्या घरुन बनवुन आणायचा असुन सजावटीचे साहित्य सोबत आणणे अनिवार्य आहे. तसेच त्यापदाथार्ची कृती व माहिती सोबत ठेवणे आवश्यक राहिल. पदार्थाची मांडणी सकाळी ११.०० वाजता पर्यंत कृषि महोत्सय येथील तयार करण्यात आलेले शासकिय दालन यामध्ये करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

            विजेता स्पर्धाकांना आयोजकांमार्फत रोख बक्षीस देण्यात येणार असून सहभागी स्वर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.पाककला स्पर्धेनंतर लगेच पाककला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये डॉ. मिरा खडकर आहारतज्ञ, नागपुर यांचेव्दारे पौष्टीक तृणधान्य व आहारातील महत्व, पोषण सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असुन पौष्टीक तृणधान्य पाककला या विषयावर नागपुर येथील  गौरव गोमासे प्रसिध्द शेफ प्रात्याक्षिकांव्दारे प्रशिक्षण देणार आहेत तरी जास्तीत जास्त संख्येने महिला व शेतकरी महिला गटांना सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे.