नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

भंडारा दि. 23 : महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन केले.

जिल्हाधिका-यांनी नेताजी बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी  प्रशांत पिसाळ व उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी आज नेताजी बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.