महिलांना सामाजिक,आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – खासदार अशोक नेते.

महिलांना सामाजिक,आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – खासदार अशोक नेते.

ब्रह्मपुरी येथे घर तिथे रांगोळी स्पर्धा, बक्षीस वितरण सोहळा व हळदी कुंकू कार्यक्रम महिला मोर्चा तालुका ब्रम्हपुरी यांच्या वतीने आयोजित….

भारतीय जनता पार्टी नमो चषक -2024 बेटी बचाव बेटी पढाओ महाराष्ट्र प्रदेश आयोजित घर तिथे रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा व हळदी कुंकू कार्यक्रम भाजपा महिला आघाडी तालुका ब्रम्हपुरी च्या वतीने लोकमान्य टिळक वाचनालय सराफा लाईन ब्रम्हपुरी येते आयोजित करण्यात आले. ह्या स्पर्धेचे ब्रम्हपुरी येथे पारितोषिक वितरण समारंभ खासदार अशोक नेते व माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला

बेटी बचाओ,बेटी पढाओ या योजनेअंतर्गत घर तिथे रांगोळी या स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना खासदार अशोक नेते व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करतांना
केंद्र सरकारने महिलांसाठी राजकीय आरक्षण 33% करून महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात महिला सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महिला सक्षमीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना व पुरुषांना समान अधिकार तसेच महिलांसाठी व पुरुषांसाठी एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ घेता येईल म्हणून राज्य सरकारने महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम राबविलेला आहे.
महिलांनी घराबाहेर पडून घर कामासोबतच समाजकार्य राजकारणाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

याबरोबरचं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी महिलांसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव ही महत्वाकांशी योजना राबविली.असे प्रतिपादन घर तिथे रांगोळी व हळदी कुंकू या कार्यक्रमाच्या प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर,प्रदेश महामंत्री महिला आघाडी च्या अल्काताई आत्राम,प्रदेश सचिव महिला आघाडी च्या रेखाताई डोळस, ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, भाजपाचे जेष्ठ नेते डॉ.बालपांडे सर,भाजपा तालुका अध्यक्ष अरूण शेंडे, महिला संयोजिका वंदनाताई शेंडे,भाग्यश्रीताई देशकर, शिलाताई गोंदोडे,उर्मिलाताई धोटे,मंजिरीताई राजनकर,वर्षा चौधरी,निलमताई सुरमवार, पुष्पाताई शेरकी,शोभाताई बाबणवाडे,यासमिनीताई लाखाणी,रत्नाताई दंडवते, रीतूताई शेट्टी, विभा सुभेदार, तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनीं उपस्थित होते.