नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

 

भंडारा दि.21: जिल्ह्यात शनिवार, रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त भागातील शेती व पिकांची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तातडीने पाहणी केली.

 

अवकाळी पावसाने जिल्ह्यात 42 गावांचे नुकसान झाले असून यामध्ये 529 बाधित शेतकरी आहे. यामध्ये 227 हेक्टर शेतीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये तुमसर व लाखांदुर तालुक्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

 

मौजा सोरणा तालुका तुमसर येथील काल झालेल्या अवकाळी पावसाने व गारपीट मुळे झालेल्या पिकांचे नुकसानीची पाहणी करताना जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी तुमसर बी. वैष्णवी, तहसीलदार तुमसर श्री. टेळे व तालुका कृषी अधिकारी तुमसर उपस्थित होते. तसेच पाहणी दरम्यान जांब, आंधळगाव, चिचोली ता. मोहाडी येथे देखील नुकसानग्रस्त भागाची पिक पाहणी केली.