महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून बेमुदत संपाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून बेमुदत संपाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती गडचिरोलीच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून बेमुदत संप पुकारला असून गेल्या वर्षानुवर्षांपासून अनेक मागण्या प्रलंबित असल्याने तसेच वाढती महागाई खाजगीकरण व अल्प वेतन यात स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा गंभीर प्रश्न कंत्राटी कामगार पुढे उभा ठाकला आहे. आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बेमुदत संपास्थळी भेट देऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या व प्राण पणाला लावून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सरकार दुर्लक्षित करून वाऱ्यावर सोडत असल्याचे टीकास्त्र विरोधी पक्ष नेते श्री वडेट्टीवार यांनी डागले. सोबतच देशातील शेतकरी बेरोजगार तरुण, व प्रशासकीय सेवेतील तथा खाजगी सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतन वाढ व विविध भत्ते देण्याऐवजी केवळ देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ करून संपूर्ण देशाची वाटोळे करीत आहे. असे ते यावेळी म्हणाले. तसेच हगामी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रखरपणे व प्राधान्याने मुद्दा मांडून या समस्येचे निराकरण करून असे अभिवचन यावेळी त्यांनी उपस्थित त्यांना दिले. याप्रसंगी प्रामुख्याने युवक काँग्रेस प्रदेश सचिव तथा विजय क्रांती कामगार संघटना अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर नामदेव कीरसान, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनरावजी सावसाकडे, युवक काँग्रेसचे विश्वजीत कोवासे तथा गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यावेळी कंत्राटी कामगारांनी विजय भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दे सरकार विरुद्ध रोष व्यक्त करीत निषेध व्यक्त केला.