आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध – खासदार अशोक नते

आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध – खासदार अशोक नते
शहीद शिरोमणी गैंदसिंह शहादत दिवस श्रद्धांजली समारोह मौजा-मुरुमगांव येथे संपन्न.

धानोरा तालुक्यातील मौजा-मुरुमगांव येथे आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना ब्लॉक मुरूमगांव यांचे विद्यमाने शहिद शिरोमणी गैंदसिंह शहादत दिवस श्रद्धांजली समारोह कार्यक्रम आज दिनांक.२० जानेवारी २०२४ ला शहीद गैंदसिंह व बिरसा मुंडा चौक,हायवे रोड,मुरूमगांव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

शहादत दिवस श्रद्धांजली समारोह या कार्यक्रमाला उद्घाटनप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी संबोधित करतांना म्हणाले कि,आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध असून हया समाजाच्या विकासासाठी शासन स्तरावर अनेक योजना कार्यान्वित करून अंमलात आणले आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आपल्या स्तरावर प्रयत्नशील कार्य करित आहे.देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी म्हणून द्रोपदी जी मुर्मू यांना विराजमान केल्या यात मौलाचा व सिंहाचा वाटा आहे.खऱ्या अर्थाने आपल्या आदिवासी समाजाला मिळालेला हा बहुमान आहे.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्याने आपण दिवाळी सारखा सण साजरा करावा. प्रत्येकांनी आपल्याला घरोघरी दिवे लावून आनंदोत्सव साजरा करावा.असे उद्घाटन स्थानावरून खा.नेते यांनी प्रतिपादन करीत मी रेल्वे संबंधित अनेक रखडलेले कामे मार्गी लावले आहे. एवढेच नाही तर धानोरा,मुरूमगांव, भानुप्रतापपुर व छतीसगढ़ पर्यत जाणारा नविन रेल्वे लाईन मंजूर करून घेतला आहे.त्याचबरोबर अनेक रस्त्यांचे विकासात्मक कामे केले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही समस्या माझ्या पर्यत आल्या येथील सामाजिक समस्या समजून घेऊन निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन या निमित्ताने आश्वासित करतो.असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.

या प्रसंगी प्रामुख्याने मंचावर उद्घाटक खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी.जि.प.अध्यक्ष साईनाथ साळवे, तालुकाध्यक्षा लताताई पुन्घाटे,ब्लाक अध्यक्ष मनिराम रावटे,माजी सभापती पं.स.अजमन रावटे,ता.महामंत्री विजय कुमरे,माजी पं.स.सदस्य हिरामण हरामी,थानेदार मिथून सिरसाट,प्रा.आरोग्य केंद्राचे डॉ. बनसोड, जयलाल मार्गीया, तुळशीराम कोरेटी,श्रावणजी हरामी,मदन बढई,नरेंद्र आत्राम, भुपेंद्रशाह मडावी,ब्लाक उपाध्यक्ष बैसाखुराम कोटपरिया,सचिव सरादु चिराम,कोषाध्यक्ष दयाराम कवलिया तसेच मोठया संख्येने आदिवासी महिला, बंधू भगिनीं उपस्थित होते.