चंद्रपुर जिल्ह्यात मंदिर महास्वच्छता अभियान यशस्वी करा – विवेक जॉनसन

चंद्रपुर जिल्ह्यात मंदिर महास्वच्छता अभियान यशस्वी करा – विवेक जॉनसन

चंद्रपुर जिल्हयातील 824 ग्रामपंचायतीत संपूर्ण स्वच्छता (डिप क्लिनिंग) मोहिम राबविण्यात येणार आहे.  या मोहिमेची सुरुवात महास्वच्छता अभियानाने झाली असुन, संपूर्ण स्वच्छता  मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कामे करण्यात येणार आहेत. संपुर्ण जिल्हयात ग्रामीण भागामध्ये संपूर्ण स्वच्छता सप्ताह दि 14 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत मंदिर व धार्मिक स्थळे  स्वच्छ करायची असुन, चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक गावात मंदिर महास्वच्छता अभियान यशस्वी करा. असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

मंदिर महास्वच्छता अभियान अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व गावातील मंदीरे ,धार्मिक स्थळे व परिसर पुर्णतः स्वच्छ करायचा असुन, त्यासंबंधीचे निर्देश सर्व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. मंदिर महास्वच्छता अभियान प्रत्येक गावात यशस्वी कसे करता येईल .यासाठी तालुका स्तरावरुन नोडल अधिकारी नेमण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. अभियान कालावधित सर्व गावातील मंदिरे, धार्मीक स्थळे व परिसर स्वच्छ होण्याच्या अनुषंगाने सर्व गावात मंदिर महास्वच्छता अभियान राबविण्याच्या अनुषंगाने जनजागृती करुन, गावातील बचत गट, ग्रामपंचायत सदस्य, भजणी मंड्ळ, युवक मंडळ , गावातील कर्मचारी यांचा अभियानात सहभाग घ्यावा. गावपातळीवरील व्हॉटस ॲप दवंडी व नोटीस देऊन व गावामध्ये सर्व दर्शनी भागात फ्लेक्स लावून प्रसिद्धी व जनजागृती करण्या बाबत सुचना देण्यात आल्या आहे.

जिल्हयातील सर्व मंदिर व धार्मिक स्थळे व त्यांचा  परिसर स्वच्छता करुन, मंदीरावर रोशनाई करण्यात येणार आहे.  सर्व मंदिरे व आसपासच्या परिसरातील स्वच्छता मोहिम स्वरूपात करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निहाय स्वच्छता अभियानाचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असुन, जिल्हा स्तरीय मंदिर महास्वच्छता अभियान चंद्रपुर तालुक्यातील तिर्थक्षेत्र वढा येथुन करण्यात येणार आहे. 20 जानेवारी 2024 रोजी  एक दिवस मंदिर स्वच्छते साठी देण्यात येणार असुन, चंद्रपुर जिल्यातील सर्व गावात यादिवशी  मदिंर महास्वच्छता अभियान राबवुन  जिल्ह्यातील सर्व मंदीरे , धार्मिक स्थळे पुर्णतः स्वच्छ करावी. चंद्रपुर जिल्ह्यात मंदिर महास्वच्छता अभियान यशस्वी करावे असे आवाहन  चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.