राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने जिल्हा वाहतुक नियत्रंण शाखे तर्फे जनजागृतीसाठी रथ तयार .

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने जिल्हा वाहतुक नियत्रंण शाखे तर्फे जनजागृतीसाठी रथ तयार .

आज दिनांक १६/०१/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय समोर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अनुषंगाने जिल्हा वाहतुक नियत्रंण शाखा, भंडारा ने जनजागृती रथ तयार केला आहे. सदर जनजागृती रथाचे फित कापून व हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ मा. श्री. लोहित मतानी पोलीस अधिक्षक भंडारा, व श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक भंडारा यांचे हस्ते करण्यात आले. देशात, राज्यात व भंडारा जिल्हयात दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते, त्याचप्रमाणे यावर्षीही दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ पर्यंत भंडारा जिल्हयात रस्ता सुरक्षा अभियान २०२४ जिल्हा

वाहतुक नियत्रण शाखा, भंडारा यांचे वतीने राबविण्यात येत आहे. सदर रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, भंडारा वाहतुक नियमाविषयी शालेय विद्यार्थी, सामान्य नागरिक यांचे मध्ये जनजागृती व्हावी व रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होवून जिवीत व वित हानी कमी व्हावी या उद्देशाने जनजागृती रथ तयार करण्यात आला आहे. सदरचा जनजागृती रथ भंडारा जिल्हयातील सर्व १७ पोलीस स्टेशन हद्दीतील गावागावात जावून जनजागृती करणार आहे.

रस्ता सुरक्षा अभियान- २०२४ हे दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ पर्यत राबविण्यात येणार असून त्यादरम्यान वाहतुक नियंत्रण शाखा, भंडारा वतीने शाळा, विद्यालय, महाविद्यालयात पीपीटी चे सादरीकरण व विवीध स्पर्धाचे आयोजन करुन जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच वाहन चालक / मालक चौक सभा, बैठक घेवुन वाहतुक नियमाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

सदर रस्ता सुरक्षा अभियान – २०२४ व जनजागृती रथाचे शुभारंभास पोलीस अधिकारी पोनि. सुभाष बारसे, सपोनि. पंकज बैसाणे वाहतुक अंमलदार पोहवा स्वप्नील गुल्हाने, मपोहवा. मनीषा चौधरी, नवनाथ डोईफोडे, गरिबा तांडेकर हे उपस्थित होते.