मृतक अंगणवाडी मदतनिसला शासकीय मदत म्हणून १०लाखाची मदत व पतीला चपराशी पदांवर नौकरीची मागणी

मृतक अंगणवाडी मदतनिसला शासकीय मदत म्हणून १०लाखाची मदत व पतीला चपराशी पदांवर नौकरीची मागणी
भंडारा :  लाखांदूर तालुक्यातील मासाळ येथे राहणारी सौ .कमल विजय गोंधळे वय ४७ वर्ष  या  अंगणवाडी क्रमांक तीन मासाची मदतनीस  दिनांक ०८/०१/२०२४ ला सुमारे चार वाजता एसटी बस क्रमांक एम एच ४० किंवा ६२ ५६ मध्ये भंडारा बस स्टेशन मधून काही अंगणवाडी कर्मचारी बसमध्ये बसलेले असताना श्रीनगरच्या जवळपास बस उसळली आणि अंगणवाडी मदतनीसच्या डोक्याला मार लागला आणि ती बसमध्येच पडली.त्यानंतर एसटी बसच्या चालकाने पीएससी पहेला या ठिकाणी घेऊन गेले आणि पीएससी पहेला येथून अ‍ॅम्बुलन्सने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणण्यात आले आणि सुमारे पाचच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे डॉक्टरांनी त्या मदतनीस ला मृत घोषित केला. अंगणवाडी मदतनीस सौ.कमल गोधळे यांच्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अपघाती मृत्यु झाला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँगेस पार्टीच्या वतीने  अंगणवाडी मदतनीस जिल्हा परिषदेच्या वतीने तत्काळ आर्थिक मदत जाहिर करण्यात यावे तसेच त्यांच्या पतीला चपराशी या पदावर शासकीय नोकरी मध्ये रुजू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भंंडारा जिल्हयाच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर मागण्यासंबंधी त्वरीत कार्यवाहि न झाल्यास जिल्हा पातळीवर आंदोलनाचा प्रवित्रा घेण्यात येईल याची सर्व जबाबदारी हि जिल्हा परिषद प्रशासनाची राहील असे कळविण्यात आले आहे़
निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, एकनाथ फेंडर मोहाडी तुमसर विधानसभा अध्यक्ष तर्था ैज् सदस्य, नरेश ईश्वरकर्र ैज्  सदस्य, तालुका अध्यक्ष ईश्वर कळबे, ओबीसी जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम व इतर पदाधिकारी उपस्थित होते