बांधकाम कामगारांनी आमिषाला बळी पडू नये

बांधकाम कामगारांनी आमिषाला बळी पडू नये

 

भंडारा, दि. 7: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यात येतो. संगणकीकृत प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांच्या छाननी व तपासणीअंती सदरचे लाभ हे थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले जातात.

 

सदरची कामे करुन देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे. तरी सर्व बांधकाम कामगारांना कळविण्यात येते की,अशा कोणत्याही आमिष अथवा दबावास बळी पडू नये. अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयांशी संपर्क साधवा, असे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे कळविण्यात आले आहे.