आजपासून पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

आजपासून पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा

चंद्रपूर, दि.28 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 29 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यात सहभाग घेण्याकरिता उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. मोबाईलद्वारे नोंदणीसाठी प्ले-स्टोअरवरील महास्वयंम अप्लीकेशन इन्स्टॉल करावे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट मधील जॉब सिकर पर्याय निवडून आपला नोंदणी/आधार क्रमांक व पासवर्ड ने लॉगीन करावे. प्रोफाईल होम पेजवरील पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर -6 हा पर्याय निवडावा. चंद्रपूर जिल्ह्याची निवड करून फिल्टर बटनावर क्लिक करावी. नंतर ॲक्शन मेनुतील दुसऱ्या बटनावरील व्हॅकन्सी लिस्टींग यावर क्लिक करून आय ॲग्री हा पर्याय निवडावा. त्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या आस्थापना/कंपन्यांच्या रिक्त पदांसाठी अप्लाय करावे.

उद्योजकांसोबत व्हॉट्सॲप च्या माध्यमातून संपर्क साधून ऑनलाईन मुलाखती द्याव्या व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.