आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तोकडी : मदतीत वाढ करावी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तोकडी : मदतीत वाढ करावी

विधानसभा विरोधी पक्षनेते
विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर, २१
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी एक लाख रुपये मदतीची रक्कम अत्यंत तोकडी असून त्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

प्रश्नोत्तरे तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी वडेट्टीवार बोलत होते

वडेट्टीवार म्हणाले, कर्ज बाजारी झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पाच लाख रुपयांचे कर्ज फेडू नशकल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. शासनानेही लेखी उत्तरात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी दिलेली आहे.राज्यात
२ हजार ४७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करून द्यावी अशी आग्रही मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.