सुरक्षित आरोग्याकरिता नियमित हात धुवा – श्याम वाखर्डे

सुरक्षित आरोग्याकरिता नियमित हात धुवा – श्याम वाखर्डे

जागतीक हातधुवा दिवस उत्साहात साजरा.

चंद्रपुर (प्रतिनिधी)दिनांक 17/10/2021  बदलत्या जगाचा सामना करायचा असेलतर, आपल आरोग्य हे सुरक्षित राखल्या गेले पाहिजे. आपल्या हातावर अनेक जिवजंतु बसतात .त्यामुळे आरोग्य बिघडत आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी नियमित साबणाने हात स्वच्छ धुतले पाहीजे . असे मत खुटाळा येथे आयोजित जागतिक हात धुवादिनाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तथा पाणी व स्वच्छता श्याम वाखर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
        कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंचायत समिती चंद्रपुरचे गटशिक्षणाधिकारी बापुराव मडावी यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन स्वच्छ भारत मिशन चे माहिती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे उपस्थित होते. मार्गदर्शन पर भाषणात बोलतांना जागतिक हातधुवा दिन साजरा करण्यामागे काय कारणे आहेत व का साजरा केला जातो. यावर खानझोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शालेय स्वच्छता सल्लागार मनोज डांगरे यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्यांने हात कसे स्वच्छ धुवायचे यांचे प्रात्याक्षिक करुन दाखविले. हात धुण्याच्या सात पध्दतीनुसार उपस्थित विद्यार्थ्यांकडुन हात धुण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन अशाच प्रकारे जिल्ह्यातील गावागावात जागतिक हातधुवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजंय धोटे, जिल्हा पांणी व स्वच्छता मिशन कक्षाचे साजिद निजामी, बंडु हिरवे, तृशांत शेंडे , पंचायत समिती चंद्रपुरचे गट समन्वयक अर्शिया शेख, समुह समन्वयक किसन आक्कुलवार , केंद्रप्रमुख रत्नमाला खोब्रागडे व शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आभार शाळेचे मुख्याध्यापक अंडसकर यांनी मानले.