गोगो च्या झुरक्यात तरुणाई बेधुंद ! शालेय अल्पवयीन मुले नशेचे आहारी..

गोगो च्या झुरक्यात तरुणाई बेधुंद !
शालेय अल्पवयीन मुले नशेचे आहारी..
सिंदेवाही : संदीप बांगडे.
शहरातील युवा पिढीची तरुणाई वयात
गांजा, चरस, अफीम सेवनासाठी आता नशेबाज तरुणांना ‘गोगो’ पेपरची भुरळ पडली आहे. या पेपरमध्ये तंबाखू किंवा अमली पदार्थ भरून नशेच्या आहारी गेले आहेत.
शहरातील रस्त्यालगतच्या , बसस्थानक जवळील पानटपऱ्यांवर गोगो नावाने पेपर विकला जातो. गोगो चे 3 पेपर्स असतात.
चिलमला पर्याय म्हणून याचा वापर वाढला आहे.नशेचा बाजार मांडणाऱ्यांकडून नशेला अधिक नफेखोर बनवण्यासाठी नव्या शक्कल लढवल्या जातात. अशीच शक्कल लढवून तयार केला जाणारा गोगो पेपर अवघ्या १० रुपये किवा 20 रुपये किमतीत पान टपऱ्यांवर मिळत आहे. नशाकरिता वापरणारा पेपर विक्रीमुळेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अल्पवयीन मुलेही हा गोगो पेपर खरेदी करत असल्याचे टपरीचालक खासगीत सांगतात, तर काही टपरीचालक या पेपरमध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचाही दावा करतात.

राज्यात अमली पदार्थांवर कारवाई होत असली, ग्रामीण भागात गांजाला सर्वाधिक मागणी आहे. तो चिलममध्ये भरून ओढला जातो. मात्र, चिलम तरुणांना सहज मिळत नाही. त्यामुळे गांजा, चरस ओढण्यासाठी गोगो पेपर वापरण्याची नवी शक्कल नशेबाजांनी शोधून काढली आहे. गोगो पेपर सिगारेट चे कागदासारखा पातळ पेपर असून या रिकाम्या पेपरच्या आत गांजा, चरस, अफिम, भांग यांसारखे अमली पदार्थ भरले जातात. त्यानंतर या पेपरचे पुढील टोक बंद करून नशा केली जाते. गोगो पेपर काय आहे ? नशेच्या आहारी गेल्याने होणाऱ्या अल्पवयात मुलांचे आरोग्य, शिक्षण, व्यसन त्रासदायक होणार शहरातील सुजाण नागरिकांत चर्चा सुरू आहे.

– गोगो पेपर काय आहे ?
पान टपरीवर गोगो पेपर 10 रुपये किमतीचा असून त्यामध्ये पातळ 3 कागद असतात. नशेली पदार्थ कागदात गुंडाळी करून सिगरेट सारखा धूर निघण्याकरिता गोगो पेपर चे झुरक्यात.. त्रासदायक होणार आहे.