‘अ’ वर्ग तीथेक्षेत्र दर्जा मिळाल्याने गुरूदेव भक्तांकडून सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार

‘अ’ वर्ग तीथेक्षेत्र दर्जा मिळाल्याने गुरूदेव भक्तांकडून सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार

ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे गुरुकुंज आश्रमाला ‘अ’ वर्ग दर्जा

चंद्रपूर, दि. 8 : अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील गुरूकुंज आश्रमाला राज्यशासनाने ‘अ’ वर्ग तीथेक्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. या आश्रमाला हा दर्जा मिळावा, यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे गुरूकुंज आश्रमाला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करीत अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाकडून ना.मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला आणि आभार व्यक्त करण्यात आले.

चंद्रपूर येथील गिरनार चौकातील भारतीय जनता पार्टीच्‍या कार्यालयात मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांचा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम  मोझरी यांच्‍यावतीने श्री. लक्ष्‍मणरावजी गमे यांच्‍या हस्‍ते व गुरुदेव सेवकांच्‍या उपस्थितीत सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे  प्रा. कंठाळे, पद्माकर मलकापुरे, पद्माकर ठाकरे, डॉ. जयप्रकाश जयस्‍वाल, रुपलाल कावळे, सुभाष कासनगोट्टूवार, किशोर कापगते, दादाजी नंदनवार, ढवस, वसंतराव धंदरे, पुरुषोत्तम राऊत, आनंदराव मोझे, महादेव चिकरे, खिरडकर, आनंदराव मांदाडे, बबनराव अनमुलवार, देवराव बोबडे, अशोक भिडेकर, संतोष राऊत, रामराव धारणे, रामदाव उरकुडे, भास्‍कर भोकरे, उषा मेश्राम, माया मांदाडे, शुभांगी अलमुलवार, ऋषीजी गोहणे, गौरव दिवसे, संदिप झाडे, शिवदास शेंडे, चेतन कवाडकर, पोकोले, जगदिश हांडेकर, सुखदेव चोथाले, चित्रा गुरनुले, रजनीगंधा कवाडकर, कल्‍पना गिरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत लाखो  गुरुदेव  भक्‍तांचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या अमरावती जिल्‍ह्यातील श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमासाठी विशेष बाब म्‍हणून प्रयत्न केले नसते तर आश्रमाला सहजासहजी हा दर्जा मिळाला नसता, अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली. मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करत विधिमंडळात व विधिमंडळबाहेरही श्री क्षेत्र गुरुकुंजला विशेष बाब म्‍हणून अ-वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे यावेळी गुरूदेव भक्तांनी नमूद करत आभार मानले.

संघर्षाला यश मिळाल्याचा आनंद
१९३५ मध्‍ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज मोझरी येथे आश्रम स्‍थापन केले. हे केवळ आश्रम नव्हे तर गुरुदेव भक्तांसाठी उर्जास्रोत आहे. यापूर्वी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव नागपूर विद्यापीठाला मिळावे म्हणून व आता गूरूकुंज आश्रमाला अ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा म्हणून मी केलेल्‍या संघर्षाला व पाठपुराव्याला यश मिळाले याचा मला विशेष आनंद व अभिमान आहे. हे भाग्‍य मला तुम्‍हा सर्वांच्‍या शुभेच्‍छा व आशिर्वादाच्‍या बळावरच लाभले, अशी प्रतिक्रिया ना. श्री. मुनगंटीवार यांनी सत्कार प्रसंगी दिली.

राष्‍ट्रसंतांवर चित्रपटही येणार
राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या जीवनावर चित्रपट काढण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. लवरकच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती देखील ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.