मॉब ड्रिलचे आयोजन करण्यात आले

मॉब ड्रिलचे आयोजन करण्यात आले

दिनांक १८ सप्टेंबर २०२३ सोमवार रोजी पोलीस कवायत मैदान येथे पोलीस अधीक्षक भंडारा मा. श्री. लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनात व चारही उपविभागीय भंडारा, तुमसर, साकोली व पवनी या चारही डिव्हीजन मध्ये येणा-या प्रत्येक पोलीस स्टेशन मधील डिव्हीजन ठिकाणी गणपती / ईद-ए- मिलादुनबी यादरम्यान कोणतेही अनुचीत प्रकार घडणार नाही. तसेच कावसुचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि जिल्हात कोणताही प्रकारची शांतता भंग होणार नाही. याकरीता मॉब ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच पोलीस मुख्यालय भंडारा येथील कवायत मैदानावर उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. अशोक बागुल यानी प्रत्यक्ष हजर राहुन मॉब ड्रिल परेडला हजर होते. यावेळी एकुण १५ अधिकारी व १४० कर्मचारी हजर होते. भंडारा डिव्हीजन मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची मॉब ड्रिलचे सराव परेड घेण्यात आली. तसेच मॉब ड्रिलचे सराव परेड मध्ये सॅक्सन मॉब ड्रिलचे तयार करुन या कामाची सगळयांना तालीम देण्यात आली. या प्रशिक्षण सरावामध्ये टियर स्मोक ग्रिनेड १ नग, स्टन ग्रिनेड १ नग, डॉयमार्कर ग्रिनेड १ नग, अग्नी वर्षा सेल १ नग अश्या प्रकारे तालीम घेण्यात आली.

यावेळी राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी, कवायत निर्देशक, आरसीपी, क्युआरटी, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार हजर होते.