आफ्रोट संघटनेचे सिंदेवाही तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन

आफ्रोट संघटनेचे सिंदेवाही तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन

सिंदेवाही – आज दि. 21/11/2023 ला आफ्रोट संघटना तालुका शाखा सिदेंवाही च्या वतीने मा. जिल्हाधिकारी जि चंद्रपूर तथा मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर यांना अनुक्रमे मा. तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी सिदेंवाही यांच्या मार्फतीने अनुसुचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे किंवा ते अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचान्यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ न देण्याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातरफे देण्यात आले.

संद‌र्भिय शासन पत्र दिनांक 10/11/2023 अन्वये अधिसंख्य पदावरील कर्मचान्यांना 11 महिल्यानंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड असल्यामुळे वेतनवाढ अनुदेय नाही यावरुन अभिसंख्य पदावरील वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी / कर्मचा-यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ न देण्याबाबत संघटनेची धारणा पक्की झाली आहे. करीता अशा अधिसंख्य प्रदावर कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ न देण्याबाबतचे निवदेन मा. राजु ताडाम अध्यक्ष आफ्रोट संघटना शाखा सिंदेवाही तथा मा मंगलदासजी मेश्राम तथा मा सुनील ऊईके सल्लागार तालुका शाखा गट, दिपक म्हैस्कर, केवलदास गेडाम, प्रमोद कोवे व ईतर सदस्यांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे.