भंडारा : महाराष्ट्र पशुविज्ञान परिषदेची कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र पशुविज्ञान परिषदेची कार्यशाळा संपन्न

भंडारा,दि.29:- निरंतर पशुवैद्यकीय शिक्षण अंतर्गत महाराष्ट्र राज्य व्हेटरनरी काँन्सील नागपूर अंतर्गत कार्यशाळा 27 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय.एस.वंजारी यांनी केले. कार्यशाळेत पोल्ट्री व्यवस्थापन व मार्केटिंग आणि प्राटोझून रोग याबाबत माहिती व मार्गदर्शन केले.

पशुविज्ञान कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक डॉ.अजय पोहरकर, अध्यक्ष एम.एस.व्ही.सी होते तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बलदेव रामटेके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेश कापगते उपस्थित होते.

कार्यशाळेत एम.ए.एफ.एस.यू येथिल प्राध्यापक डॉ. मुकूंद कदम व डॉ. सतिश जाधव यांनी अनुक्रमे पोल्ट्री व्यवस्थापन व मार्केटिंग आणि प्रोटोझून रोग याबाबत मार्गदर्शन केले. पशुवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. अजय पोहरकर, डॉ. सोनकुसरे, डॉ. खोडसकर, डॉ. भडके, डॉ. डांगोरे, डॉ.वराडकर यांना आयोजक तसेच अतिथी यांनी पुष्पगुच्छ व मानचिन्ह देवून सन्मानित केले.

या कार्यशाळेसोबतच नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत असल्याने अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किशोर कुंभरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एमएलडीबी उपायुक्त डॉ. गोरे, डॉ. फुके व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. नितीन ठाकरे उपस्थित होते. नागपूर विभागातील जास्तीत जास्त कृत्रिम रेतन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सहाय्यक आयुक्त डॉ. निनाद कोरडे यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अतुल डांगोरे यांनी मानले.