चंद्रपूर : पशुचिकित्सा सुविधा उपलब्ध होण्यासाठी ‘1962’ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत

पशुचिकित्सा सुविधा उपलब्ध होण्यासाठी

‘1962’ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत

चंद्रपूर दि. 28 जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि. 12 जानेवारी 2021 रोजी मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेचे लोकार्पण करण्यात आले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 31 जिल्ह्यांमधील 72 तालुक्यांमध्ये फिरत्या पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याच्या हेतूने सुसज्ज चिकित्सा प्रणाली असणारी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सदर योजना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने व एका फोन क्रमांकावर चिकित्सा सुविधा उपलब्ध होण्यासाठी 1962 या हेल्पलाइन क्रमांकाचे कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेअंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे सेवा उपलब्ध होत असून या संधीला जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त, सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.