मोहाळी येथे कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन

मोहाळी येथे कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन
सिंदेवाही
“विजयकिरण फाऊंडेशन”तथा मा.आ.विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात प्रथमच टेलीमेडिसीन तंत्रज्ञानयुक्त हायटेक कँन्सर तपासणी हॉस्पीटलच्या साह्याने मोफत रूग्णसेवा शिबीराचे आयोजन आज सिंदेवाही तालुक्यातील मौजा मोहाळी (नलेश्वर) येथे केले होते.या शिबीरात ११० रूग्णांची तपासणी करण्यात आली त्यामधील २ पेशंट पुढील उपचारासाठी नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी हॉस्पीटल येथे रेफर करण्यात आले.

याप्रसंगी बाबुरावजी गेडाम,हरीभाऊ बारेकर,जानकिराम वाघमारे संचालक कृ.उ.बा.समिती,मुर्लीधर चौधरी,विलास कोवे,प्रफुल अगडे,डाँ.वर्मा सर प्रा.स्वास्थ.केंद्र मोहाळी,अशोक सहारे,मोरेश्वरजी ज्ञानवाडकर काँग्रेस कार्यालय प्रमुख सिंदेवाही तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पीटलचे डॉक्टर्स,नर्स व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते!