दिव्यांग मतदान अधिकाऱ्यांद्वारे होणार सहा मतदान केंद्राचे संचालन

दिव्यांग मतदान अधिकाऱ्यांद्वारे होणार सहा मतदान केंद्राचे संचालन
गडचिरोली दि.13 : लोकसभा निवडणूकीसाठी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील सहा मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांद्वारे केल्या जाणार आहेत. यात 250-देवरी, 127-देसाईगंज, 142-अहेरी, 159-लोनवाही(ब्रम्हपुरी) व 183-चिमुर या मतदान केंद्राचा समावेश आहे. या मतदान केंद्रावरील मतदान नोंदणीचे सर्व कामकाज दिव्यांग मतदान अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण 10 हजार 678 दिव्यांग मतदारांची नोंद आहे. यात दृष्टीदोष असलेली 1553, मुक-बधीर 1012, अस्थिव्यंग 5506 तर इतर 2607 असे एकूण 10 हजरी 678 दिव्यांग मतदार आहेत.
ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्क्यापेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील 338 दिव्यांग मतदारांचे गृहमतदानासाठी अर्ज मंजूर करण्यात आले असून निवडणूक यंत्रणेद्वारे 8 ते 14 एप्रिल या कालावधीत त्यांचे मतदान नोंदविण्यात येत आहे.