अंगणवाडी शारदा देवी विसर्जन सोहळा महिलांचा उत्तम प्रतिसाद 

अंगणवाडी शारदा देवी विसर्जन सोहळा महिलांचा उत्तम प्रतिसाद 

अंगणवाडी शारदा देवी विसर्जन सोहळा महिलांचा उत्तम प्रतिसाद : बाई पण भारी देवा ! सिंदेवाही:. शहरातील गणेश वॉर्ड अंगणवाडी शारदा महिला मंडळाचे वतीने शारदा देवी विसर्जन सोहळा पारंपारिक पद्धतीचे विलोभनीय नृत्याने आकर्षणात बाई पण भारी देवा ! शारदा देवीची विसर्जन मिरवणूक प्रेक्षकांना उत्तम प्रतिसादात लक्षवेधी ठरली आहे. शहरातील शारदा महिला मंडळाच्या वतीने शारदा देवी स्थापना करण्यात आलेली होती. महाराष्ट्रामध्ये नवरात्र व शारदा उत्सव ,गरबा, रास दांडिया मोठ्या उत्साहात साजरा करतात. नवरात्र मधील उत्साहामध्ये महिला ,मुले ,मुली ,पुरुष व महिला यांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो परंतु गणेश वार्डातील अंगणवाडी शारदा महिला मंडळाच्या वतीने महिलांच्याच पुढाकाराने शारदा देवी चा उत्साह साजरा केला जातो. विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.अंगणवाडी शारदा महिला मंडळाचे शारदा देवी विसर्जन मिरवणुक दरम्यान , पारंपरिक मराठी नृत्य, विविध वेशभूषा, कला गुणांना प्रतिसाद देणारे नृत्य, दांडिया, फुगडी, झिम्मा, जुने आठवणींना उजाळा देणारे नृत्य, करणारे मंडळातील महिला चा समावेश होता. सोबतीला नवीन चित्रपटातील बाईपण भारी देवा ! या गाण्याचे नृत्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद विसर्जन मिरवणुकीत मिळाला. विसर्जन मिरवणूक दरम्यान पारंपरिक पद्धतीने, शारदा देवी लायटिंग ची घोडा बग्गी, साधे पांढरे लाईट चे उजेडात नृत्य करणे, धांगडधिंगा नको, विसर्जन सोहळा मध्ये पुरुषांचे सहभाग नको,भजनाचे टाळ, लेझिम, सुपली, नववारी साडी, पैठणी, विविध शृंगार परिधानाने नटलेले महिला मंडळ होते. विसर्जन मिरवणुकीत नृत्य , शारदा देवी चे समोर करीत असताना प्रेक्षकांनी गर्दी केलेली होती. अंगणवाडी शारदा देवी चे शांततेत विसर्जन सोहळा पार पडला आहे.