सिंदेवाहीत तहसीलदार बदलो मोहीम,सहा महिन्यात चार तहसीलदार मिळाल्याने तालुक्याचा कारभार ढेपाळला.

सिंदेवाहीत तहसीलदार बदलो मोहीम,सहा महिन्यात चार तहसीलदार मिळाल्याने तालुक्याचा कारभार ढेपाळला.

सिंदेवाही :-तहसील कार्यालय सिंदेवाही येथे या ना त्या कारणाने तहसीलदार बदलो मोहीम सुरू झाली असून मागील सहा महिन्यात या कार्यालयाला चार तहसीलदार मिळाले असल्याने सिंदेवाही तालुक्याचा कारभार ढेपाळला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मागील सहा महिन्यापूर्वी तत्कालीन तहसीलदार गणेश जगदाळे यांची इतरत्र बदली झाली. तेव्हा पासून नीलिमा रंगारी, योगेश शिंदे, शुभम बाहकर, आणि आता नुकतेच नव्याने रुजू झालेले संदीप पानमंद असे एकूण चार तहसीलदार म्हणून या कार्यालयाला मिळाल्याने तहसीलदार बदलो मोहीम सुरू झाली की, काय ? अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे. सिंदेवाहीच्या आता पर्यंतच्या इतिहासात सहा महिन्यात पहिल्यांदाच चार चार तहसीलदार या कार्यालयाने पाहिले आहे. आता नव्याने रुजू झालेले तहसीलदार संदीप पानमंद यांना या तालुक्यातील गौण खनिज आणि रेती तस्करी चे आव्हान पेलावे लागणार आहे.