बेरोजगारासाठी प्रशिक्षणाचे आयोजन…

बेरोजगारासाठी प्रशिक्षणाचे आयोजन

        भंडारा, दि.25 : भारत सरकार महाराष्ट्र शासन एवं बॅक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था आरसेटी, भंडारा संस्थेद्वारा नि:शुल्क प्रशिक्षण कार्यकमाचे दिनांक 26 ऑक्टोबर,2023 पासून  दहा दिवसीय प्रशिक्षण सुरु होत आहे.

         विविध पाककृतीशी  संबंधित या प्रशिक्षणामध्ये मसाला चाट पावडर ,भेल पुरी, दही पुरी, सेव पुरी, पावभाजी,गुपचुप बनविणे समोसा.कचोरी, कांदा भजीया,पकोडे, मंचुरीयन, फ्राईड राईस, वेज पुलाव, दही राईस. नुडल्सए चाऊमीन, मोमो व कर्ज विषयक मार्गदर्शन  करण्यात येईल. उद्योजकीय कौशल्य व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल व्यवसायची संधी बाजार सर्वेक्षण बॅकेच्या योजना हया बद्दल देखील मार्गदर्शन दिले जाईल. प्रशिक्षण प्रवेशाकरिता आयोजित मुलाखतीकरिता येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला.गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड जॉब कार्ड, सोबत आणणे आवश्यक

 आहे.

         तसेच प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवन, चहा, नाश्ता, राहणे आदीची सोय मोफत केली जाईल. स्वयंरोजगारांची आवड  व व्यवसाय करण्याची तयारी असणाऱ्या आणि वय  18 ते 45 वर्षे , शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा बेरोजगार पुरुष आणि महिलांनी मुलाखतीकरिता 26 ऑक्टोबर,2023 रोजी सकाळी  दहा वाजता बि. ओ. आई. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण  संस्था, आरसेटी बिल्डींग लालबहादुर शास्त्री मनरो शाळेच्या बाजुला शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे असे आवाहन बि. ओ. आई आरसेटी  मिलीद इंगळे यांनी  कळविले आहे.