इंदिरानगरातील छत्रपती शिवाजी चौक व छत्रपती शिवाजी कॉलनीचा शुभारंभ

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते इंदिरानगरातील छत्रपती शिवाजी चौक व छत्रपती शिवाजी कॉलनीचा शुभारंभ

दिं.१२ मार्च २०२३

गडचिरोली शहरा लगतच्या इंदिरानगर प्रभाग क्रमांक ०६ येथील छत्रपती शिवाजी चौक व छत्रपती शिवाजी कॉलनी या नावाने ओळखल्या जाण्यासाठी बोर्ड फलक लावून पूजा अर्चना करून याचा शुभारंभ उद्घाटन या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे जाणता राजे होते.त्यांनी प्रजेसाठी संघर्ष करून स्वराज्य स्थापन केलं.

मराठा साम्राज्याचे संस्थापक,शूरवीर, नावाची गौरवगाथा,करण्यासाठी छत्रपती शिवाजी चौक व छत्रपती शिवाजी कॉलनी या नावाने ओळखले जावे यासाठी आयोजित कार्यक्रम करण्यात आला.

महाराज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती

अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज

राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.अशा जय घोषणाने उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

त्यावेळी खासदार अशोकजी नेते,माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,नगरसेवक आशिष पिपरे, बंडू चौधरी, किशोर पोचमपल्लीवार, आशिष घोडमारे, गौरक्षण लटारे, भास्कर कायते, मारकवार सर, जुमनाकेजी, ज्ञानेश्वर कायते, वैरागडे सर, गुंडावार सर,तसेच अनेक महिला वर्ग व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.