भंडारा येथे पोलीस हुतात्मा दिवस कार्यक्रमाचे आयोजन

भंडारा येथे पोलीस हुतात्मा दिवस कार्यक्रमाचे आयोजन

भंडारा:- कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणा-या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणुन संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृतीदिवस म्हणुन पाळला जातो. त्यानिमित्ताने आज दि. २१ ऑक्टोबर पोलीस मुख्यालय, भंडारा येथील पोलीस हुतात्मा स्मारक स्मृतिस्तभ येथे स. ०८.०० वा. श्रध्दांजली व शोक सलामीचे आयोजन करण्यात आले. मा. पोलीस अधिक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस श्री. ईश्वर कातकडे, श्री. सुशांत सिंग, सहा पोलीस अधीक्षक साकोली, श्रीमती निती पुढी रस्मीताराव सहा पोलीस अधीक्षक तुमसर, डॉ. अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी भंडार, श्री. मनोज सिडाम उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी हे उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधिक्षक मा. पोलीस अधिक्षक श्री. लोहित मतानी यांनी आजचा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा दिवस आहे. हयावर्षी देखील संपुर्ण भारतातून एकूण १८८ पोलीस अधिका-यांनी / कर्मचा-यांनी आपले कर्तव्य – बजावीत असतांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांना शतशः वंदन असे बोलून शहीद पोलीसांच्या स्मृतिना उजाळा दिला. तसेच २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लद्दाख हद्दीत भारत तिबेट सीमेवर १६ हजार फुट उचावर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे १० शिपाई गस्त घालत असताना ‘हिंदी-चिनी भाई भाई’ असा नारा लावणा-या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला. याची चाहूल लागताच सीमेच्या रक्षणार्थं अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रास्त्रे याची पर्वा न करता प्राणपणाने सदरहू १० पोलीस जवान लढलेत व मातृभुमीच्या रक्षणार्थं या शुरविरानी मोठया संख्येने असणा-या शत्रुशी लढा देत स्वतःचे प्राण अर्पण केले. तब्बल २४ दिवसानंतर म्हणजे १३ नोव्हेंबर १९५९ रोजी चिन्यांनी या वीर पोलीस जवानांचे मृतदेह भारताचे स्वाधीन केलेत, तेव्हा सारा देश हळहळला जड अंतःरणांचे पोलीस इतमानाने या विरांवर अत्यंसंस्कार करण्यात आला. ज्या हॉटस्प्रिंग येथे विरांनी प्राणार्पण केले, तेथे संपुर्ण भारतातल्या पोलीसांनी या विरांचे स्मारक उभारले. स्मारकावर शब्द अंकीत आहेत. ” when you go home tell them of us. For their tomorrow we gave up our todoy”

आमच्या सुखकर भविष्याकाळासाठी या १० शिलेदारांनी त्याचा जागता वर्तमान समर्पित केला. त्या हॉट स्प्रिंगच्या विरांचे स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा दिवस हुतात्मा दिन / पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो व दरवर्षी आपल्या कर्तव्यापर बलीदान करणा-या, विरगती प्राप्त करणा-या, विरगती प्राप्त करणा-या सर्व पोलीस हुताम्यांना सा-या भारत भारत देशातील पोलीस दल मानवंदना देवून श्रध्दांजली अर्पण करुन १० शिलेदारासह हौताम्म पत्करलेल्या पोलीसांची आठवण उजळविल्या जातो.

सदर प्रसंगी पोलीस अधिक्षक श्री. लोहित मतानी व अपर पोलीस श्री. ईश्वर कातकडे, श्री. सुशांत सिंग, सहा पोलीस अधीक्षक साकोली, श्रीमती निती पुड़ी रस्मीताराव सहा पोलीस अधीक्षक तुमसर, डॉ. अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधिकारी भंडार, श्री. मनोज सिडाम उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अद्धांजली वाहीली व अग्नीशस्त्राव्दारे ३० काडतूसांच्या फैरी झाडून शोक सलामी देण्यात आली. तसेच पोलीस बॅन्ड पथक यांनी राष्ट्रभक्तीपर गितांच्या धुन वाजवुन श्रध्दांजली अर्पण केली. पोलीस हा समाजातील एकमेव घटक आहे. जो दिवस रात्र आपल्यासाठी सज्ज असतो. १५ ऑगस्ट १९४९ पासुन शहीद झालेल्या सर्व शुर पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे भावपुर्ण श्रध्दाजंली देण्यात आली..

सदर प्रसंगी कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या शहीदाची नावे श्री. मनश्याम नवखरे पोलीस स्टेशन कारचा, श्री. अनिल मांदाडे यांनी वाचन केले तसेच भंडारा जिल्हयातील शहीद पोलीस अधिकारी / कर्मचारी पोउपनि दिपक सखराम रहिले, पोहवा. योगेश्वर तुकाराम हेडाऊ, पोशि, शिवलाल सिताराम बरैया, पो. शि. दामोधर शंकर वडतकर, पो. शि. रविकुमार सेवकराम

जौंजाळ, पो. शि. ईशांत कुमार रामरतन भुरे, पो. शि. भोजराज शंकर बांभरे, पो. शि. मुलचंद शामराव भोयर, पो. शि. मनोज शालीकराम गि-हेपुंजे, पो. हवा. विश्वनाथ यादवराव बोरकर, पो. शि. जयपाल शेळके, स. फौ. शराफा हुसैन पठाण, पो. हवा. सुनिल महादेव मेश्राम, भुपेश पांडुरंगजी वालोदे, सिताराम पुनाजी चौधरी, सेवकराम मारुती कापगते यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हातील शहिद अधिकारी व कर्मचारी यांचे कुटूंबीय सदर कार्यक्रमात उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला पोलीस उपअधिक्षक गृह श्री. सचिन पवार, पोलीस निरीक्षक विचोळकर स्थागुशा भंडारा, पोलीस निरीक्षक श्री जितेन्द्र बोरकर जिवीशा भंडारा, सहा. पोलीस देशपांडे सायबर सेल भंडारा, पोलीस निरीक्षक श्री. मट्टामी दोषसिध्दी कक्ष भंडारा, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती. बाबर प्रशिक्षण सेल भंडारा, सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती कुलकर्णी भरोसा सेल भंडारा, पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी, राखीव पोलीस उपनिरीक्षक पवनसिंग, प्रधान, सर्व शाखेचे पोलीस मुख्यालय येथील कवायत निर्देशक, कर्मचारी तसेच पोलीसांचे कुटुंबिय हजर होते. कार्यक्रमाचे रुपरेषा म.पो. ना. वर्षा सेलोकर यांनी केले.