विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित

मुंबई, दि. 6 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन मंगळवार दि.7 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे होणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी परिषदेत तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.

या अधिवेशनात विधानपरिषदेचे कामकाज एकूण 6 तास 30 मिनिटे झाले. त्यापैकी सरासरी कामकाजाचा कालावधी 3 तास, 15 मिनिटे एवढा होता. या कालावधीत विधानपरिषदेत 9 विधेयके संमत झाल्याची माहिती श्री. निंबाळकर यांनी दिली.

विधानसभेचे प्रत्यक्षात कामकाज 10 तास 10 मिनिटे झाले. त्यापैकी सरासरी कामकाजाचा कालावधी 5 तास, 10 मिनिटे एवढा होता. या कालावधीत विधानसभेत 9 विधेयके संमत झाल्याची माहिती श्री.झिरवाळ यांनी दिली.