अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीस 03 वर्षे सक्षम कारावास व २५०००/- रु. दंडाची शिक्षा

अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीस 03 वर्षे सक्षम कारावास व २५०००/- रु. दंडाची शिक्षा

गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश श्री आर. आर. खामतकर यांचा निर्णय.

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक ०१/०६/२०२१ रोजी श्री. प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली व पोलीस स्टाफ असे प्रोव्हीजन रेड करीता मुरखळा भागात गेले असता मुखबीर कडून खात्रीशीर गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी नामे स्वामी नरसय्या गणवेनवार रा. मुरखळा हे देशी विदेशी दारु बागळून विक्री करीत आहेत. अशा खात्रीशीर गोपनिय माहीतीवरुन पंचा समक्ष आरोपीचे घर झडती घेतली असता विदेशी दारुच्या निपा मिळून आल्याने आरोपी विरुध्द कलम ६५ (इ) म.दा. का. अन्वये नोंद करुण तपास घेतला.

सदर गुन्हयाचा तपास पोहवा / १९२८ रमेश उसेंडी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करुन आरोपी विरुध्द भरपुर व सबळ पुरावा गोळा करुन मा. न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले असता मा. न्यायालयाने SSC नं. ३८९ / २०२१ अन्वये खटला चालवुन फिर्यादी व साक्षीदार तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आज दि. १२/०९/२०२३ रोजी आरोपी नामे स्वामी नरसय्या गणवेनवार, वय ५३ वर्ष रा. मुरखळा त. जि. गडचिरोली यास मा. प्रथम श्रेणी न्यायाधीश आर. आर. खामतकर यांनी कलम ६५ (इ) अन्वये ०३ वर्ष सश्रम कारावास व २५०००/- दंडाची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील श्री. बी. के. खोब्रागडे यांनी कामकाज केले तसेच संबंधीत प्रकरणात साक्षीदारांशी योग्य समन्वय साधून प्रकरणाची निर्गती करीता पोहवा / २२७७ दिनकर मेश्राम, पोअं/३९९९ हेमराज बोधनकर यांनी योग्य भूमिका पार पाडली.